Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकुर प्रकरणी अटकेतील तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; एक आरोपी अद्यापही फरारच!
न्यायालय

साकुर प्रकरणी अटकेतील तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; एक आरोपी अद्यापही फरारच!

घटनेनंतर तब्बल पंधरा दिवसांनी दाखल झाला होता गुन्हा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २२ मार्च, संगमनेर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अद्यापही या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रुबाब पान शॉपमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून सौरभ रावसाहेब खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने २९ फेब्रुवारीला सकाळी आठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अत्याचार केला होता. सौरभ खेमनर मुलीवर अत्याचार करत असताना त्याचा जोडीदार योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने पान स्टॉलचे शटर बाहेरून बंद करून त्याला कुलूप लावून घेतले होते. तर त्यांचे आणखी दोघे मित्र प्रशांत भास्कर भडांगे (रा. भडांगे वस्ती, साकुर) व विजय खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) या दोघांनी बंद शटर बाहेर उभे राहून देखरेख ठेवत अत्याचारासाठी मदत केली. यावेळी येथे आलेल्या बाजीराव दातीर यास तू येथे का आलास इथून निघून जा, असे म्हणत दमबाजीदेखील केली होती. याशिवाय या गुन्ह्यामध्ये विकास रामदास गुंड (रा. गुंड वस्ती, साकुर) याचा देखील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. मात्र या घटनेतील त्याचा प्रत्यक्ष सहभाग काय आहे हे नेमके समोर आलेले नाही.

या घटनेनंतर पीडित मुलीने घरी गेल्यानंतर विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. २९ फेब्रुवारीला घडलेल्या या घटने प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये १७ मार्चला पाचही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गटांचे पडसाद सर्वत्र उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, चित्रा वाघ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. याप्रकरणी समाजात मोठा जनक्षोभ निर्माण झाला आहे.

पोलिसांनी सौरभ खेमनर प्रशांत भडांगे व योगेश खेमनर या तिघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी या संदर्भात समाजामध्ये मोठा जनक्षोभ निर्माण झाला असल्याचे न्यायालयाला सांगत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 899
न्यायालय पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.