Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था ८१ कोटींचा अपहार: मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह न्यायालयाने जामीन नाकारलेले आरोपी पोलिसांना सापडेना; व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, कर्जदार आरोपी अजित व सुजित कदमांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे लक्ष!
गुन्हेगारी

दूधगंगा पतसंस्था ८१ कोटींचा अपहार: मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह न्यायालयाने जामीन नाकारलेले आरोपी पोलिसांना सापडेना; व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, कर्जदार आरोपी अजित व सुजित कदमांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे लक्ष!

डॉ. कुटेंवर पोलीस मेहरबान का? चौकशीची मागणी करत ठेवीदारांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/03/2024Updated:24/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दि. २४ मार्च, संगमनेर

अनंत पांगारकर

तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील व्हाईट कॉलर आरोपींपर्यंत पोलिस यंत्रणेला पोहोचण्यात अपयश आले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजला जाणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या आरोपीपैकी एकही आरोपी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. नगर अर्बन बँकेत एकापाठोपाठ आरोपींवर कारवाई करत ठेवीदारांना दिलासा देणारी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा दूधगंगा प्रकरणी मात्र राजकीय दबावाखाली देखील असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हाच एकमेव आरोपी सध्या अटकेत असून आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यानेदेखील जामीन मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. गुंजाळ याच्यासह या गुन्ह्यातील कर्जदार आरोपी असलेले अजित कृष्णराव कदम व सुजित कृष्णराव कदम या दोघा आरोपींनी देखील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून या अर्जावरील सुनावणी व निर्णयाकडे ठेविदारांचे लक्ष लागले आहे.

अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी या घटनेतील गांभीर्य न्यायालयाला पटवून देण्यात योग्य भूमिका बजावल्याने दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अध्यक्ष भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबातील सर्वच आरोपी, औरंगाबाद येथील चेतन नागराज बाबा कपाटे महाराज, राहुरी येथील कृष्णराव कदम व प्रमिला कदम आदींचे अटकपूर्व जामीन संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने यापूर्वीच फेटाळलेले आहे. यातील काही जणांनी या निर्णयाविरोधात व अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांच्या फिर्यादीनंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटेसह २१ लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रमुख बहुतांश आरोपी हे १९ ऑगस्टपासून पोलिसांना सापडू शकलेले नाही. ठेवीदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या या आर्थिक दरोडेखोरांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ठेवीदारांनी उपोषणाचा देखील मार्ग सातत्याने अवलंबला. मात्र केवळ आश्वासना पलीकडे त्यांच्या पदरात अद्याप काही पडू शकलेले नाही.

डॉ. कुटेंची चौकशी करा !

दरम्यान मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सातत्याने न्यायालयात व अन्य ठिकाणी धावपळ करणाऱ्या डॉ. प्रदीप कुटे यांच्याकडे तपास यंत्रणेने आरोपी संदर्भात सखोल चौकशी करण्याची प्रसंगी त्यांना ताब्यात घेण्याची मागणी उपोषणादरम्यान ठेवीदारांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली आहे. एरव्ही एखाद्या गुन्ह्यात मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी नातेवाईकांना जेरीस आणणाऱ्या पोलीस यंत्रणेने डॉ. कुटे यांची सखोल चौकशी केल्यास यातून आरोपींसंदर्भात माहिती समोर येऊ शकते? मात्र असे होताना दिसत नाही. ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने तपास यंत्रणेने यादृष्टीने देखील तपास करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,334
आर्थिक गुन्हे शाखा दूधगंगा पतसंस्था न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.