Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरणात भाऊसाहेब कुटेच्या या नातेवाईक आरोपींनाही जिल्हा न्यायालयाचा दिलासा नाहीच; आता तरी आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना जेलमध्ये घालणार का?
न्यायालय

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरणात भाऊसाहेब कुटेच्या या नातेवाईक आरोपींनाही जिल्हा न्यायालयाचा दिलासा नाहीच; आता तरी आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना जेलमध्ये घालणार का?

अजित कदम व सुजित कदम यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2024Updated:27/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर

चेअरमन भाऊसाहेब कुटेसह त्याच्या नातेवाईकांनी तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलेल्या बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेची मोठी अपडेट समोर आली आहे. मोठ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा सिलसिला कायम राहिला आहे.

या घोटाळ्यातील चेअरमन भाऊसाहेब कुटे याचे नातेवाईक असलेले कर्जदार आरोपी अजित कृष्णराव कदम व सुजित कृष्णराव कदम या दोघांचा अटकपूर्व जामीन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी नाकारला आहे. ऑगस्ट २०२३ पासून पोलिसांना गुंगारा देणारे आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या, समाजात व्हाईट कॉलर म्हणून मिरविणाऱ्या या गुन्हेगारांना न्यायालयाने बेल नाकारल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा त्यांना पकडून जेलमध्ये टाकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या आर्थिक गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेल्या पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबातील सर्वच आरोपी, औरंगाबाद येथील चेतन नागराज बाबा कपाटे महाराज, राहुरी येथील कृष्णराव कदम व प्रमिला कदम आदींचे अटकपूर्व जामीन संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने यापूर्वीच फेटाळलेले आहे. त्या पाठोपाठ आता न्यायालयाने अजित कृष्णराव कदम व सुजित कृष्णराव कदम या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ऑगस्ट २०२३ पासून या गुन्ह्यातील सर्वच प्रमुख आरोपी बाहेर असताना आर्थिक गुन्हे शाखा या आरोपींना अटक करण्याचे धाडस का दाखवत नाही, यामागे कोणता राजकीय दबाव तर नाही ना असा देखील प्रश्न ठेवीदारांमधून तसेच सहकारातील जाणकारांमधून उपस्थित होत आहे.

अजित कदम व सुजित कदम यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपींच्यावतीने ॲड. व्ही. के. तनपुरे यांनी युक्तिवाद केला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी या आर्थिक गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता जामीन नाकारणे का महत्त्वाचे आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. एकापाठोपाठ एक करत बहुतांशी आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असला तरी देखील आरोपींना अटक होत नसल्याने त्यांच्या ठेवी परत कधी मिळणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,282
आर्थिक गुन्हे शाखा दूधगंगा पतसंस्था न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

22/07/2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

05/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कौठे मलकापूर (संगमनेर):  संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी)…

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.