Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि भाजीपाल्याचे लिलाव सुरू!
शेती व सहकार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी… संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि भाजीपाल्याचे लिलाव सुरू!

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दि. २ एप्रिल

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाला लिलावासोबत टोमॅटोचे देखील सोमवारपासून (१ एप्रिल) लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.

पहिल्याच दिवशी या लिलावास शेतमाल निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. लिलावामुळे व्यापाऱ्यांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला देखील चांगला भाव मिळत आहे.

सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये टोमॅटोचे लिलाव सुरू आहेत. प्रतवारी करून आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर बाजार समितीकडून तात्काळ पक्की हिशोबपट्टी देऊन मालाचा मोबदला व्यापाऱ्यामार्फत रोखीने दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील टळली आहे.

त्यानंतर दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत भाजीपाला लिलाव सुरू आहेत.

शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेजारच्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी न्यावा लागत होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी स्थानिक व हक्काचे बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री केल्यानंतर संबंधितांकडून त्याचे पेमेंट लगेचच रोख रकमेच्या स्वरूपात घ्यावे, असे आवाहन सभापती खेमनर व सचिव गुंजाळ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,596
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.