Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्यजित ताबेंनी “ऑल दि बेस्ट विशाल दादा” म्हणत महाविकास आघाडीचे नेते मामा बाळासाहेब थोरातांची सांगलीच्या उमेदवारीवरून केली अडचण!
राजकारण

सत्यजित ताबेंनी “ऑल दि बेस्ट विशाल दादा” म्हणत महाविकास आघाडीचे नेते मामा बाळासाहेब थोरातांची सांगलीच्या उमेदवारीवरून केली अडचण!

आमदार सत्यजित तांबे निवडणूक प्रचारात काय भूमिका घेणार याकडे लागले लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2024Updated:17/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि.१७ एप्रिल 

धुळे, सातारा आदि महत्त्वाच्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे थोरातांची कोंडी झाली असल्याचे दिसते. तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाटेला गेली आहे. येथून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. साताऱ्याच्या या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. संभाव्य बंडखोरी आणि काँग्रेस मधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे थोरात यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच सांगलीच्या जागेवरून मामा-भाच्याची वेगवेगळी भूमिका समोर आली.

तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून निवडणुकीमुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात त्यांनी उमेदवारी केली होती. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यासह त्यांचे वडील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. नाशिकच्या या जागेवर ते निवडूनही आले. सत्यजित तांबे यांना मानणारा युवकांचा मोठा वर्ग राज्यात आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष या दोघांचे निलंबन मागे घेईल याचा फायदा राज्यात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा होती मात्र काँग्रेस कडून असा कोणताही निर्णय होतांना दिसत नाहीये.

विशेष म्हणजे तांबे पिता-पुत्रांचा प्रभाव असलेल्या नाशिक मतदारसंघातील धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध दाखविला आहे तर डॉक्टर तांबे यांनी येथून उमेदवारी करावी अशी देखील काहींची मागणी आहे. हा वाद मिटविण्याचे मोठे आव्हान थोरात यांच्यासमोर असतानाच भाचा आमदार सत्यजित तांबे यांच्या भूमिकेमुळे मामा समोरील पर्यायाने काँग्रेस समोरील अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. तांबे यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असल्याचे दिसते.

थोरात यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाच तांबे यांनी आपल्या एक्स हॅण्डल वर विशाल पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की… Vishal Dada, All the best ! विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. 

विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी.

Vishal Dada,

All the best !

विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे.

वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर… https://t.co/wRIiaJtQMt

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 16, 2024

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,228
आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.