Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला न्यायालयाने दिली सक्तमजुरीची शिक्षा
न्यायालय

अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला न्यायालयाने दिली सक्तमजुरीची शिक्षा

संगमनेरचे जिल्हा न्यायाधीश वाय. एच. आमेठा यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2024Updated:18/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि.१८ एप्रिल

एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन पुतणीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिरात नेत तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पांडुरंग यशवंत शेंगाळ, रा. शेंगाळवाडी, हिवरगाव पठार ता. संगमनेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना महामारीच्या काळात आरोपी आपल्या घरी आला होता. नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेला आरोपीला पोलिसांना पकडता आले. त्यानंतर आरोपी तुरुंगात होता.

१९ जुलै २०१३ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुट्टी होती. मात्र सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दहावीत शिकणारी पंधरा वर्षे पीडित मुलगी शाळेमध्ये जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यासाठी गेली होती. शाळेतील शिक्षकांकडे कागदपत्रे देऊन ती घरी परतत असताना तिच्या नात्यातीलच पांडुरंग यशवंत शेंगाळ हा आपल्या दुचाकीवरून येत रस्त्यात तिला भेटला.

पळशी (ता. पारनेर) येथे पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन लगेच येऊ, असे म्हणत त्याने पीडित मुलीला फसवून आपल्या दुचाकीवर बसवत घारगाव-बोटा -केळेवाडी- कातरवेढा या रस्त्याने जुन्नर तालुक्यातील नळावणे या गावाच्या जवळ माळावर असलेल्या खंडोबा मंदिरात नेले. मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने मंदिराच्या गेटमध्ये पीडित मुलीला जवळ घेऊन आवळत माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू फार आवडतेस म्हणून मी तुला फसवून येथे निवांत ठिकाणी घेऊन आलो असल्याचे सांगितले. पीडित मुलीने त्याच्या प्रेमाबद्दल नकार दिल्यानंतर त्याने तिला खाली पाडून तिच्यावर बलात्कार केला.

पिडीतेने यावेळी आरडाओरडा केला मात्र जवळ कोणी नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. नंतर आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला महागात पडेल, व मी तुझा कायमचा काटा काढील असा दम दिला. तो पीडित मुलीला तेथेच सोडून जाईल या भीतीने तिने कोणाला काही सांगणार नाही असे सांगून त्याच्या गाडीवर बसून शेंडेवाडी येथे नातेवाईकाकडे जात तेथे मुक्कामी थांबले. तेथून दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला शाळेत आणून सोडले व तो निघून गेला.

यावेळी पीडित मुलीचे आई-वडील तिला शोधण्यासाठी शाळेत आले असता तिने झालेल्या प्रकार आई-वडिलांना व शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर आई वडिलांच्या मदतीने पीडित मुलीने घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग यशवंत शेगाळ याच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता३६३, ३७६, ५०६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांनी याप्रकरणी सखोल तपास करत आरोपी फरार असल्याने त्याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर सुरू होती.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहताना या खटल्यात पीडित मुलीसह, पीडितेचे वडील, पंच, वर्गशिक्षक, शाळेचे हेडमास्तर, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी या सात जणांच्या महत्त्वपूर्ण साक्षी न्यायालयासमोर आणल्या.

  • दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपी पांडुरंग यशवंत शेगाळ याला दोषी ठरवत भादवी ३६३ नुसार सात वर्ष सक्तमजुरी, ३७६ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) चार अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील पंचवीस हजार रुपये पीडित मुलीला देण्याच्या आदेश न्यायालयाने दिले.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,387
घारगाव पोलीस जिल्हा व सत्र न्यायालय सक्तमजुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.