Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेरातील उद्योजक ‘अमित पंडित’चा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम….; पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या अटकपूर्व जामीना संदर्भात न्यायालयाने दिला हा निर्णय
न्यायालय

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेरातील उद्योजक ‘अमित पंडित’चा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम….; पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या अटकपूर्व जामीना संदर्भात न्यायालयाने दिला हा निर्णय

खटला दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि.२३ एप्रिल

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेर मधील कर्जदार आरोपी उद्योजक अमित पंडित यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पंडित याची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार सत्येन्द्र कुमार रावत यांना मात्र तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नगर अर्बन २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा ३३ कोटी रुपयांचा कर्जदार म्हणून आरोपी पंडित याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पंडित गेल्या काही दिवसांपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. तर पंडितची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार रावत आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नव्हती.

दरम्यानच्या कालावधीत या तिघांनीही अटकपूर्व अंतरिम जामीन मिळावा यासाठी न्यायालयात स्वतंत्ररित्या जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग टळला असून ठेवीदारांसाठी ही धक्कादायक बाब असल्याचे सहकारातील जाणकारांचे मत आहे.

पंडित याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याने देखील जामीन मिळण्यासाठी लगेचच न्यायालयासमोर अर्ज केला होता. गेल्या काही दिवसांपासून या अर्जावर जिल्हा न्यायालय सुनावणी सुरू आहे. कोठडी दरम्यान चौकशीतून नेमके काय समोर आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रकरण दुसऱ्या न्यायालयात वर्ग…

दरम्यान या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सित्रे यांच्यासमोर सुरू होती. मात्र आता हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश लोणे यांच्या कोर्टात वर्ग करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,698
अमित पंडित जिल्हा न्यायालय नगर अर्बन बँक सपना पंडित सात्विक पंडित
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.