Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या बोटा गावातील यात्रेत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ‘यासाठी’ रोखले… बघा व्हिडिओ…
राजकारण

संगमनेरच्या बोटा गावातील यात्रेत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ‘यासाठी’ रोखले… बघा व्हिडिओ…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2024Updated:30/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि.३० एप्रिल 

अवघ्या तेरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक पदाधिकारी मिळेल तिथे बोलण्याची संधी सोडत नाहीत, याच पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना यात्रेत बोलण्यास विरोध झाल्याने त्यांना तेथून निघून जावे लागले.

शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार प्रचारात दंग असले तरी कार्यकर्त्यांची मात्र त्यांना अद्यापही म्हणावी अशी फारशी साथ मिळत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उमेदवाराकडून पूर्ण होत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवाराबाबत हे चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या तेरा दिवसात सर्वप्रमुख उमेदवारांची मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्यातच आता सभांचा देखील धडाका उडणार आहे.

मंगळवारी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील ग्रामदैवताची यात्रा असल्याने प्रचाराची संधी सादर खासदार लोखंडे सकाळीच महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथे हजर झाले होते. सुरू असलेल्या मिरवणुकीत लोखंडे सामील झाले. जल्लोषात सुरू असलेल्या या मिरवणुकीत लोखंडे थेट डीजे असलेल्या गाडीवर चढले. पाठोपाठ त्यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी बोलण्यासाठी डीजे सोबत असलेल्या यात्रेतील संयोजकांकडे माईकची मागणी केली.

मात्र गावची यात्रा असल्याचे सांगत बोलण्यासाठी माइक देणार नसल्याचे तरुणांनी सांगितले. त्यामुळे डीजेवर चढलेल्या लोखंडे यांना पुन्हा खाली उतरून तेथून निघून जावे लागले. या संबंधीचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे.

बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240430-WA0007.mp4
लग्नाला यायचं हं!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,384
बोटा लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.