मंगळवार दि. ८ मे
देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजप, एनडीए देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत केले.
मंगळवारी दुपारी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान काँग्रेसवर टीका करत म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. ओबीसी, एससी एसटी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्या गोष्टीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता तीच गोष्ट आता ही लोक मतबँकेसाठी करत आहे. त्यासाठी त्यांना घटना बदलायचे आहे. सीमा पार असलेले त्यांची बेटी च्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप देखील मोदींनी केला.
मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्यात शहीद आणि मृत झालेल्यांचा काँग्रेस नेत्याने अपमान केला केले, हा हल्ला पाकिस्तानने केला हे कोर्टात सिद्ध झाले आहे. जगानेही ते मान्य केले आणि पाकिस्तानी ही कबूल केले मात्र काँग्रेसला मान्य नाही. मात्र काँग्रेसचे नेते दहशतवादी कसाबची बाजू घेत आहे. हा शहिदांचा अपमान आहे. कसाबची बाजू घेणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करताना या काँग्रेसला एकही जागा मिळता कामा नये, असे मोदी म्हणाले.


