Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला न्यायाधीशांनी सुनावली २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि…
न्यायालय

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला न्यायाधीशांनी सुनावली २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि…

संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2024Updated:18/05/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. ९ मे

रस्त्याने जाणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस शाळेत सोडतो असे सांगून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी येथील रवींद्र वसंत गोंधे (वय २७ वर्ष) याला संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

घारगाव परिसरातील या खटल्याकडे पठार भागातील संगमनेरकरांचे लक्ष लागले होते. १२ डिसेंबर २०१८ रोजी पीडित मुलगी कच्च्या रस्त्याने शाळेत जात असताना तेथे मोटरसायकलवर आलेल्या रवींद्र गोंधे याने असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला माझ्यासोबत घारगावला चल, तुला शाळेत सोडतो. असे सांगून आपल्या मोटरसायकलवर बसवून घारगावच्या दिशेने नेले. मात्र शाळेकडे न नेता गोंधे तिला घारगावच्या दिशेने नेत असल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने आरडाओरडा केला.

मात्र आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत गप्प बसण्यास सांगितले व मोटरसायकलवरून तिला चाकणजवळ असलेल्या वासुली या गावी त्याने अगोदरच भाड्याने घेतलेल्या खोलीवर नेले. तेथे व अन्य वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने तिला घेत १२ डिसेंबर २०१८ ते १ जून २०२० या कालावधीत ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे खोटे अमिष दाखवून, कोणाला काही सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

नंतर १ जून २०२० रोजी तिला घारगावच्या ब्रिजजवळ आणून सोडले. तेथून घरी आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने झालेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(आय), ३६३, ३६६, ३२४, ५०६, बाल लैंगिक अत्याचार आदी कलमाअंतर्गत रवींद्र गोंधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी याप्रकरणी तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या काढल्याचे सुनावणी सुरू होती. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांनी पीडित मुलीच्यावतीने न्यायालयासमोर बाजू मांडत या खटल्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून या घटनेचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीचे वकिलांचा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. 

आरोपी रवींद्र गोंधे याला दोषी ठरविल्यानंतर अल्पवयीन मुलीस फुस लावून पळून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायाधीश मनाठकर यांनी या खटल्याचा बुधवारी निकाल दिला. गोंधे याला भारतीय दंड विधान कलम ३७६(३) अन्वये २० वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत पाच वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरी, भारतीय दंड विधान कलम ३३६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, भारतीय दंड विधान कलम ३६६ अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे व प्रतिभा थोरात यांनी सहाय्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 16,169
जिल्हा व सत्र न्यायालय निवाडा संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.