Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेरातील उद्योजक अमित पंडित, देवेंद्र गांधी पती-पत्नीच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाचा अखेर मोठा निर्णय…
गुन्हेगारी

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेरातील उद्योजक अमित पंडित, देवेंद्र गांधी पती-पत्नीच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाचा अखेर मोठा निर्णय…

नगर अर्बन बँक प्रकरणी आरोपींमध्ये घबराटीचे वातावरण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2024Updated:17/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे

बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करणाऱ्या व न्यायालयीन कोठडीत असलेल्या संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. यामुळे पंडितचा कोठडीतील मुक्काम वाढला असून पंडित याच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी आणि सून प्रगती गांधी या दांपत्याचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

आर्थिक कर्ज घोटाळाप्रकरणी उद्योजक अमित पंडित गेल्या तीन महिन्यापासून कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पंडित याने २६ मार्चला जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या अर्जावर सुनावणी सुरू होती. अखेर या संदर्भात जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला असून नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून काही संचालक आणि घोटाळेबाज कर्जदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असलेले आरोपी अटकेच्या भीतीने जामिनासाठी न्यायालयात धाव घेत आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी, सून प्रगती गांधी यांनी देखील अटकपूर्व जामीन साठी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. या अर्जावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी तिन्ही आरोपींची जामीन अर्ज फेटाळून लावले.

नगर अर्बनचे ठेवीदार भाग्यवान…

नगर अर्बन बँकेचे ठेवीदार खरोखरी भाग्यवान आहेत. न्यायालय त्यांचे बाजूने भक्कम आहे. ठेवीदारांवर झालेले व होत असलेले अन्याय न्यायालय सहन करत नाही. या सर्वांचा सकारात्मक परिणाम ठेवी परत मिळणेवर नक्कीच होणार आहे. गोरगरिबांची लूटमार केलेले आरोपी आता नक्कीच हादरले असतील. लूटमारीचे पैशाने काहीही विकत घेता येते हा त्यांचा भ्रम आता नक्कीच दुर झाला असेल. जे ठेवीदार न्यायालयात प्रत्येक तारखेला उपस्थित राहत होते त्यांना देखील खुप खुप धन्यवाद. आपण सगऴे मिळून असाच प्रामाणिक संघर्ष करत राहू, न्यायदेवता व सत्य आपले बाजूने आहे, आपण नक्कीच यशस्वी होवू. डी. एम. कुलकर्णी व अँड. पिंगळे साहेबांसारखे वयाची सत्तरी उलटून गेलेले युवक आपले कँप्टन आहेत. बँक बचाव समितिचे सर्व सदस्य मोलाची साथ देत आहेत सर्व पत्रकार बंधू भगिनी निःस्वार्थी साथ देत आहेत आता पोलीसांनी वेग वाढविला की सर्व काही योग्य होईल. – राजेंद्र गांधी, बँक बचाव कृती समिती

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,495
अमित पंडित अहमदनगर जिल्हा न्यायालय देवेंद्र गांधी नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.