Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू, राज्यातील १३ जागांचा समावेश; अशा आहेत राज्यातील प्रमुख लढती
राजकारण

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू, राज्यातील १३ जागांचा समावेश; अशा आहेत राज्यातील प्रमुख लढती

राज्यातील ४८ जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 20, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. २० मे 

देशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ झाला आहे. राज्यातील १३ जागांसह एकूण ४९ जागांवर आज मतदान होत आहे. आतापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. आजच्या मतदानानंतर राज्यातील सर्व जागांवरील मतदान झाल्याने मतदान प्रक्रिया संपणार आहे. शेवटचे दोन टप्पे उरले असून ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर देशात कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल.

या राज्यात आज मतदान…

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदान होत आहे.

महाराष्ट्रात येथे सुरू आहे आज मतदान…

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण हे लोकसभा मतदान संघात मतदान होत आहे.

राज्यातील अशा आहेत लढती….

नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध शांतीगिरी महाराज(अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.

धुळे : सुभाष रामराव भामरे (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश बच्छाव (काँग्रेस) यांच्यात सरळ लढत होत आहे.

दिंडोरी : डॉ.भारती प्रवीण पवार (भाजप) यांच्या विरोधात भास्कर मुरलीधर भगरे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी) निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मुंबई उत्तर : पीयूष गोयल (भाजप) आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात सरळ लढत आहे.

मुंबई उत्तर मध्य : ॲड. उज्ज्वल निकम (भाजप) यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी सरळ लढतीच्या माध्यमातून आहे.

मुंबई दक्षिण: अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना) हे आमनेसामने मैदानात उतरले आहेत.

मुंबई दक्षिण मध्य: राहुल शेवाळे (शिवसेना) अनिल देसाई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी सरळ लढत देत आहेत.

मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विरोधात समोर समोर लढत आहेत.

मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध मैदानात उतरले आहेत.

कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.

ठाणे: राजन बाबुराव विचारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना) यांच्यात सरळ लढत होत आहे.

भिवंडी: कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) यांच्यात निवडणूक रंगणार आहे.

पालघर : हेमंत सावरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी लढत होत आहे.

Advt
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 437
लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.