Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बुडालेल्या दोघांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट उलटली तीन जवानांचा मृत्यू, दोघे अद्यापही सापडेना तर दोघे रुग्णालयात! अहमदनगर जिल्ह्यातील सुगावची दुर्घटना
अपघात

बुडालेल्या दोघांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट उलटली तीन जवानांचा मृत्यू, दोघे अद्यापही सापडेना तर दोघे रुग्णालयात! अहमदनगर जिल्ह्यातील सुगावची दुर्घटना

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. २३ मे

इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा, उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याने पाच जणांचे मृतदेह हाती आल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघा तरुणांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट बुडून पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुडालेल्यापैकी एका तरुणासह तिघा जवानांचे मृतदेह हाती लागले आहे. तर अद्यापही दोघे सापडले नसून दोघांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे.

अशी आहे घटना … सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ वर्षे, रा. पेमगिरी ता. संगमनेर) हे दोघे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुगावच्या पाझर तलावाजवळील नदीपात्रात आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. मात्र पात्राचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाला बोलाविण्यात आले होते. एक स्थानिक नागरिक आणि एसडीआरएफचे (SDRF) पाच जवानांचे पथक असे सहा जण बोटीतून गेले होते. मात्र शोधासाठी गेलेली ही बोट नदीपात्रातील पाण्यात मोठा भोवरा व खड्डा असल्याने उलटून शोध पथकातील पाच जवान आणि एक स्थानिक असे सर्वजण पाण्यात पडले. यापैकी तीन जवानांचा मृत्यू झाला. पथकातील दोन जवान जखमी अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर स्थानिक नागरिकासह बुडालेल्या तरुणांपैकी एकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून शोधकार्य अद्यापही सुरू आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे संगमनेर-अकोलेचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी शोधकार्य करत आहे.

अशी आहे मृत,जखमी व बेपत्ता असलेल्यांची नावे… बुडालेल्यापैकी सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) याचा मृतदेह आढळून आला आहे. तर अर्जुन रामदास जेडगुले (वय १८ वर्षे, रा. पेमगिरी ता. संगमनेर), स्थानिक नागरिक गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) वय ३८ वर्ष, रा. मनोहरपुर, अकोले यांचा शोध सुरू आहे. तर एसडीआरएफच्या पथकातील कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार व कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांचा शोध लागला असून दोघाही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील एक जण अत्यावस्त असल्याचे समजते. तर पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा व चालक वैभव सुनील वाघ या एसडीआरएफच्या जवानांचा मृतात समावेश आहे.

माजी महसूल मंत्री थोरात घटनास्थळी … दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळतात राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी सकाळीच सुगाव बुद्रुक येथे घटनास्थळी भेट देत पाहणी करत प्रशासनाला योग्य नियोजनाबाबत सूचना केल्या.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,790
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.