Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ८१ कोटीच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटेला जिल्हा न्यायालयाने दिली या तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तपासात काय समोर येते याकडे लागले लक्ष
न्यायालय

८१ कोटीच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटेला जिल्हा न्यायालयाने दिली या तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तपासात काय समोर येते याकडे लागले लक्ष

खटल्याच्या सुनावणीकडे संगमनेरकर, राजकीय प्रतिष्ठित आणि ठेवीदारांचे लागले लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/05/2024Updated:24/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. २४ मे 

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आता या घोटाळ्याच्या अनुषंगाने काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

दूधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख आरोपी असलेला कुटे पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

आरोपींच्या अटकेसाठी व ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांनी वारंवार आंदोलने केली. मात्र आश्वासनापलीकडे ठेवीदारांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही. या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार आरोपी असलेला कुटे जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने जामीन नाकारून देखील सापडत नसल्याने तपास अधिकाऱ्यांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान अटकेपासून दिलासा मिळण्याचे सर्व मार्ग संपल्याने अखेर प्रमुख आरोपी असलेला कुटे तब्बल नऊ महिन्यानंतर गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. शहर पोलिसांनी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.

आर्थिक गुन्हे शाखेने कुटे याला अटक करत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवी मगर यांनी शुक्रवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर सरकार पक्षाच्यावतीने व आरोपीच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ॲड. मच्छिंद्र गवते यांनी या आर्थिक गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, ठेवीदारांची झालेली मोठी आर्थिक फसवणूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,750
आर्थिक गुन्हे शाखा दूधगंगा पतसंस्था न्यायालय पोलीस भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.