Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीची टीका, डीवायएसपी साहेब आता ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गुन्हेगारी

ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीची टीका, डीवायएसपी साहेब आता ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

वारंवार वादग्रस्त पोस्टमुळे व्हाट्सअप ग्रुपच्या अडचणीत वाढ!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2024Updated:28/05/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. २८ मे 

गेल्याच आठवड्यात व्हाट्सअपवर करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा याच ग्रुपच्या ॲडमिनवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनेर शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट काही विघ्न संतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर टाकल्या जातात. संगमनेरमधील माध्यमही यात मागे नाही. बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने शहरातील शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून अशा प्रकारच्या व्हाट्सअप ग्रुपवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर निगराणी ठेवणे आवश्यक बनले आहे.

संगमनेर मधील “सौ शहरी तो एक संगमनेरी” या व्हाट्सअप ग्रुप वर गेल्या आठवड्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची भाजप पदाधिकाऱ्याने टाकल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. पाठोपाठ महायुतीनेही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण होतील अशा पोस्ट टाकल्या जात असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत तक्रार, निवेदन वॉर रंगले होते.

मंगळवारी याच ग्रुपवर ग्रुप ॲडमिन संजय तवरेज (बंडू क्षत्रिय) यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या परदेश दौऱ्यावर तसेच शिवसैनिकांवर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यामुळे याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे ॲडमिनवर सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी निवेदनासोबत त्यांनी वादग्रस्त पोस्टचे पुरावे जोडले.

निवेदन देतेवेळी यांची होती उपस्थिती … माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे राजू सातपुते, उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक साळुंखे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, पंकज पडवळ, अमोल डुकरे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्तियाज शेख, शाखाप्रमुख प्रकाश चोथवे.

सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा … 

सौ शहरी तो एक संगमनेरी या व्हाट्सअप ग्रुपवर ॲडमिन संजय उर्फ बंडू क्षत्रिय यांनी स्वतःच्या मोबाईल नंबरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व ठाकरे परिवारावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली व शिवसैनिकांना हिणवत ठाकरे परिवारावर टीका केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहे. यापूर्वीही चार दिवसांपूर्वी याच ग्रुपवर ॲडमिन व इतर लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची बदनामी होईल व त्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून जाणीवपूर्वक फोटो शेअर व फॉरवर्ड केले, यावेळी सुद्धा आम्ही शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीच्यावतीने संगमनेर शहर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु या ग्रुपचे ॲडमिन संजय उर्फ बंडू क्षत्रिय हे पुन्हा-पुन्हा चूक करत आहे. यापूर्वी त्यांना दोन वेळा पोलीस प्रशासनाने नोटीसा देऊनसुद्धा ते सुधारलेले नाहीत. त्यांनी चुकीच्या पद्धतीची पोस्ट शेअर केल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा. – अमर कतारी, माजी शिवसेना शहरप्रमुख.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,466
पोलीस व्हाट्सअप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.