Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरमध्ये महायुतीने केले जोडे मारो आंदोलन
आंदोलन

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरमध्ये महायुतीने केले जोडे मारो आंदोलन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/05/2024Updated:30/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. ३० मे

महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ज्या मनुस्मृतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळले तीच मनुस्मृती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये जाळली, मात्र मनुस्मृती दहन करण्याच्या नादात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रदेखील त्यांच्याकडून फाडले गेले. हा प्रकार लक्षात येतात जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. मात्र याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे.

संगमनेरमध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महायुतीच्यावतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बस स्थानक चौकात आंदोलन करण्यात आले.

जितेंद्र आव्हाड यांना नेहमी स्टंटबाजी करण्याचे सवय लागले असून प्रत्येक वेळेस ते अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आंदोलनादरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचा मान राखणे अपेक्षित होते. मात्र स्टंटबाजी करण्याच्या नादात त्यांना याचा विसर पडला असल्याचा आरोप यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला.

आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला, संगमनेरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240530-WA0002.mp4

आंदोलनावेळी भाजपाचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, हरिश्चंद्र चकोर, गोकुळ दिघे, सिताराम मोहरीकर, राहुल भोईर, बुवाजी खेमनर, रोहिदास साबळे, दीपक भगत, हरीश वलवे, शरद गोर्डे, सोमनाथ नेहे, रोहिदास गुंजाळ, घनश्याम भारस्कर, नवनाथ कानकाटे, वरद बागुल, विकास जाधव, महेश मांडेकर, संजय वाकचौरे, सतीश गोपाळे, श्यामसुंदर जोशी, प्रशांत कोल्हे, रणजीत गायकवाड, ओंकार कातोरे, कमलेश डेरे, गणेश सोनवणे, गणेश पावसे, अरुण थिटमे, विकास गुळवे, सुयोग गुंजाळ, संजय कवडे, ऋतिक निळे, घनश्याम भोसले, गोपीचंद गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अक्षय भालेराव, शिवसेना (शिंदे) पक्षाचे दिनेश फटांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुषार ठाकूर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,103
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या…

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.