Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक … पुण्याच्या ससून रुग्णालयात दररोज एवढे मृत्यू!
आरोग्य

धक्कादायक … पुण्याच्या ससून रुग्णालयात दररोज एवढे मृत्यू!

आरोग्याचा बोजवारा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३१ मे

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील गैरव्यवहारामुळे चर्चेत आले आहे. त्यातच आता या रुग्णालयासंदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील सर्वाधिक मृत्यू या रुग्णालयात गेल्या वर्षभरात झाले असून या रुग्णालयात दिवसाला सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

ललित पाटील, अग्रवाल प्रकरणानंतर ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात गैरप्रकार वाढत असून प्रशासनाचे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. राज्यातील सरकारी रुग्णालयांत गेल्या वर्षी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी माहिती अधिकारांतर्गत सामाजिक कार्यकर्ते संतोष घोलप यांनी मागविली होती. त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने उत्तर दिले आहे.

त्यात २०२३ मध्ये सर्व सरकारी रुग्णालयांत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी देण्यात आली असून राज्यात सर्वाधिक ८ हजार ८७५ रुग्णांचा मृत्यू ससून सर्वोपचार रुग्णालयात झाल्याची नोंद आहे.ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय असून ससून रुग्णालयाची सध्या रुग्णशय्येची क्षमता सुमारे १८०० रुग्णांची आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ही नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त असते. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात दररोज सुमारे १८० रुग्ण दाखल होतात. याचवेळी बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे. दररोज रुग्णालयातून सुमारे १६० रुग्णांना घरी सोडले जाते. रुग्णालयात दररोज सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे.

अनेक जिल्ह्यांतून रुग्ण ससून रुग्णालयात पाठविले जातात. त्याचबरोबर पुणे शहर आणि जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांतूनही गंभीर रुग्ण ससूनमध्ये पाठविले जातात. ससूनमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी थेट दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे. इतर रुग्णालयांतून दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्के असून, त्यातील निम्मे रुग्ण हे ४८ तासांत दगावतात, असेही सूत्रांनी नमूद केले.

याबाबत घोलप म्हणाले, ‘ससूनचे प्रशासन रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याऐवजी भ्रष्टाचारावर भर देत आहेत. आता तर रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करावी. या प्रकरणातील सत्य बाहेर यायला हवे.’

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 905
ससून रुग्णालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.