Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी आणि अहमदनगरच्या लोकसभा मतमोजणीची अशी आहे तयारी, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
राजकारण

शिर्डी आणि अहमदनगरच्या लोकसभा मतमोजणीची अशी आहे तयारी, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणी केंद्रात मोबाईल आणि पेन नेण्यास बंदी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2024Updated:01/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १ जून 

देशभरातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ४ जून) होत आहे. नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेची मतमोजणी अहमदनगरच्या एमआयडीसीमधील (नागापूर) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून होत आहे. या मतमोजणीसाठी सुमारे १,५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.३ मध्ये होणार आहे.

अशी आहे तयारी…

एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल – अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा अशा सहा मतदारसंघांचा समावेश असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. 

मतमोजणी फेऱ्या – विधानसभा मतदार संघनिहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, संगमनेर २७८ मतदान केंद्र २२ फेऱ्या, शिर्डी २७० मतदान केंद्र २० फेऱ्या, कोपरगाव २७२ मतदान केंद्र २० फेऱ्या, श्रीरामपुर ३११ मतदान केंद्र २३ फेऱ्या तर नेवासा २७० मतदान केंद्र २० फेऱ्या होणार आहेत. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, राहुरी ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, पारनेर ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, अहमदनगर शहर २८८ मतदान केंद्र २१ फेऱ्या, श्रीगोंदा ३४५ मतदान केंद्र २५ फेऱ्या तर कर्जत-जामखेड ३५६ मतदान केंद्र २६ फेऱ्या होणार आहेत.

सुरक्षा व्यवस्था – मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे. 

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 997
अहमदनगर लोकसभा मतमोजणी लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्या…

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.