Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वैद्यकीय उपचारांसाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय
आरोग्य

वैद्यकीय उपचारांसाठी आता आभा कार्ड आवश्यक, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

आरोग्य विषयक महत्त्वाची बातमी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दिनांक १० जून २०२४

देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये नोंदणीसाठी आभा कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यामुळे आता आभा कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्डची नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नुकत्याच झालेल्या १४ व्या बैठकीमध्ये देशातील सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अपघात विभाग आणि आपत्कालिन विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या पूर्व नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे रुग्णांची नोंदणी करताना रुग्णालयातील नोंदणी क्रमांकाबरोबरच आभा कार्ड क्रमांकही आवश्यक असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी, वार्षिक नूतनीकरण यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी रुग्णालयामधील रुग्णांची संख्या आणि उपचारासाठी उपलब्ध असणारी साधनसामग्री विचारात घेणे महत्त्वाचे असते. यासाठी रुग्णांची प्रमाणित नोंदणी आवश्यक आहे.

त्यामुळे आभा कार्ड हे रुग्ण नोंदणीसाठी आवश्यक करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आणि त्यानंतरच्या मूल्यांकनातील निर्णयांसाठी, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रीसाठी आभा कार्ड नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, आभा कार्ड नसेल तरी सध्या कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सध्याच्या घडीला सात ते आठ जिल्हा रुग्णालये ही वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नाहीत. त्याचबरोबर राज्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये अशी जवळपास ५०० रुग्णालये तर १९७० प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या रुग्णालयांमध्ये सध्या आवश्यक केले नसले तरी लवकरच या रुग्णालयांमध्येही रुग्ण नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

नोंदणीसाठी आभा कार्ड आवश्यक केल्याने रुग्णांच्या मागील उपचाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधे, उपकरणे, रुग्णांचे आजार यांचा डाटा उपलब्ध होऊन सरकारला आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी नियोजन करणे सोपे होईल. ज्यामुळे आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. – डॉ. सुभाष साळुंखे, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशेषोपचार सुविधा पुरवण्यात येतात. त्यामुळे आभा कार्डच्या वापरामुळे रुग्णांचा डाटा तसेच महाविद्यालये व रुग्णालयात आवश्यक लहान उपकरणांचा आढावा घेणे शक्य होणार आहे. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी याचा लाभ होणार आहे. – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 793
आयुष्यमान भारत कार्ड वैद्यकीय उपचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.