Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माता न तू वैरीनी, आई आणि तिचा प्रियकर निघाले दोघा भावंडांचे खुनी; शेततळ्यात सापडले होते भावंडांचे मृतदेह!
गुन्हेगारी

माता न तू वैरीनी, आई आणि तिचा प्रियकर निघाले दोघा भावंडांचे खुनी; शेततळ्यात सापडले होते भावंडांचे मृतदेह!

आरोपी प्रियकराला पोलिसांनी केली अटक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2024Updated:21/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १९ जून 

दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याने गावकऱ्यांनी वाढविलेल्या दबावानंतर या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. आई आणि तिच्या प्रियकराने हे खून केल्याचे निष्पन्न झाले.

या भावंडांचा खून आई कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाची गाडे यांनी केला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे याला अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली.

१७ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय बारा वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय आठ वर्ष) या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वार्ता समोर आली होती. यामुळे तालुक्यात सर्वत्र दुःखद छाया पसरली. वर्षभर अगोदर या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत असे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणाला वेगळाच वास येत असल्याने आणि योग्य रीतीने पोलीस तपास होत नसल्याने ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांनी योग्य रीतीने तपास करत हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी नागरिकांच्या तपास यंत्रणेवर दबाव वाढला होता.

पोलिसांनी याप्रकरणी मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा) व तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे (रा. सावरगाव तळ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता घातपाताचा प्रकार समोर आला. प्रेम संबंधाच्या कारणावरून या दोघांनी दोन्ही मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याचे निष्पन्न झाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,218
घातपात पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.