Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नीट परीक्षा गैरप्रकार, निषेधार्थ संगमनेरात युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने; नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे देशाची नाचक्की – डॉ. जयश्रीताई थोरात
आंदोलन

नीट परीक्षा गैरप्रकार, निषेधार्थ संगमनेरात युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने; नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे देशाची नाचक्की – डॉ. जयश्रीताई थोरात

भाजपशासित गुजरात, बिहार व हरियाणा मधील १५६३ मुलांना अतिरिक्त ग्रेसमार्क
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २० जून

मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- २०२४ या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली असून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरतीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी कार्यालय येथे नीट परीक्षा- २०२४ मध्ये झालेल्या घोटाळ्याची व गैरव्यवहाराची चौकशी होऊन पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

डॉ. थोरात म्हणाल्या, मेडिकलचे शिक्षण घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते आणि त्यामुळे दहावीनंतर अनेक विद्यार्थी रात्रंदिवस परिश्रम करतात. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होत असते. त्यामधील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना एमबीबीएससह इतर वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळतो. मात्र यावर्षी भाजपशासित गुजरात, बिहार व हरियाणा मधील १५६३ मुलांना अतिरिक्त ग्रेसमार्क देण्यात आले आहे.

यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून परीक्षामधून मोठा घोटाळा निर्माण झाला आहे. म्हणून या नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच पेपर फोडलेल्या सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. गरीब व योग्य विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. तसेच १८ जून रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे.

याचबरोबर विविध शासकीय परीक्षांमधील गैरव्यवहार आणि गैरप्रकार हा अत्यंत धोकादायक असून हे सर्व अत्यंत पारदर्शीपणे होणे गरजेचे आहे. अन्यथा होतकरू प्रामाणिक व गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून शासनाने यावर वेळीच उपाय योजना करावी. अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 550
आंदोलन जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.