Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांचे २१ कोटी रुपये थकविणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
प्रशासन

शेतकऱ्यांचे २१ कोटी रुपये थकविणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २२ जून

शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांचे पैसे थकविले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारखान्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.

सर्वाधिक २१ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या ‘आरआरसी’चा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांकडे पाठविला होता. त्या संदर्भात साखर आयुक्तांकडे सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान कारखान्याला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांच्या देय रकमेतील काही रक्कम अदा केली असून सध्या १५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी कारखान्याकडे आहे. याशिवाय त्यावर पंधरा टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.

कारखान्याने शेतकऱ्यांना त्यांची देय असलेली रक्कम न दिल्यामुळे कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे. याशिवाय कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून साखर, मोलॅसिस व इतर उत्पादने जप्त करून त्याची विक्री करून ही रक्कम वसूल करावी, असा आदेश साखर आयुक्तांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,831
कर्मवीर कुंडलिकराव जगताप साखर कारखाना कारवाई साखर आयुक्त साखर कारखाना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.