Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जालना एसीबीची मोठी कारवाई, अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळेसह स्वीय सहाय्यकावर आठ लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या
गुन्हेगारी

जालना एसीबीची मोठी कारवाई, अहमदनगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळेसह स्वीय सहाय्यकावर आठ लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या

लाखात पगार तरी मोह सुटेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २७ जून 

अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तांनी बांधकाम परवानगीसाठी नऊ लाख तीस हजाराची लाच मागितल्याचे समोर आले आहे. एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर नगरमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान महापालिकेतील जावळे यांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे.

जालना एसीबीने ही कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या भागीदारांसह 4k रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केला आहे. सदरच्या प्लॉटवर तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांना बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडे १८ मार्च २०२४ रोजी २५४५३१ या क्रमांकाने ऑनलाईन अर्ज केलेला होता.

या बांधकाम परवानगीसाठी महापालिका आयुक्त जावळे यांनी स्वीय सहाय्यक तथा लिपिक टंकलेखक श्रीधर देशपांडे यांच्यामार्फत तक्रारदाराकडे नऊ लाख तीस हजार रुपयांची लाच मागितली होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या संदर्भात थेट जालना एसीबीकडे बुधवारी (१९जून) तक्रार केली होती.

जालना एसीबीच्या अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या तक्रारीची बुधवार व गुरुवारी पडताळणी केली असता स्वीय सहाय्यक देशपांडे याने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी पंचा समक्ष आठ लाख रुपयांची मागणी केली. तसेच पडताळणीत आयुक्त जावळे हे लाच मागणी मध्ये प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यामुळे जालना एसीबीने गुरुवारीनगर मध्ये कारवाई केली. सकाळपासूनच महापालिकेतील एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू होती. अनेक अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद होते. तर दुपारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेतील आयुक्तांचे दालन सील केले. यामुळे महापालिकेत मोठी कारवाई झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला होता. डॉक्टर जावळे आणि देशपांडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जालना एसीबी चे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 979
पंकज जावळे लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.