Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध उत्पादकांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी एकवटले, नगर जिल्ह्यात येथे सुरू आहे आंदोलन
आंदोलन

दूध उत्पादकांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी एकवटले, नगर जिल्ह्यात येथे सुरू आहे आंदोलन

दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या सहभाग वाढला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 7, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०७ जुलै

दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत.

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले.

राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील ७४ टक्के दूध खाजगी दूध संघांच्यावतीने संकलित होते. खाजगी दूध संघांना असा भाव देण्याबद्दल बंधन घालण्याचा कोणताही अधिकार कायद्याने राज्य सरकारला नसल्यामुळे असे शासन आदेश निघतात परंतु त्याची अंमलबजावणी दुध संघ करत नाहीत.

यापूर्वीही असे अनेकदा अनुभव आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यावेळी काढलेला शासन आदेश सुद्धा अशाच प्रकारे फसवा फसवी असून खाजगी दूध संघ या आदेशाची अंमलबजावणी करतील याची बिलकुल शक्यता नसल्यामुळे शेतकरी राज्य सरकारच्या या शासन आदेशावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.

सरकारने ५ रुपये प्रति लिटर अनुदानाची घोषणा केली आहे मात्र मागील वेळीही अशा प्रकारचे अनुदान देण्यात आले, ते केवळ राज्यातील २० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. अटी शर्तीमुळे बहुतांशी शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. नवीन काढलेल्या अनुदान आदेशात सुद्धा मागील अटी शर्ती तशाच ठेवण्यात आल्यामुळे यावेळीही अनुदान शेतकऱ्यांना मिळेल याची सुतराम शक्यता नसल्यामुळे अनुदान नको पण ४० रुपये भाव शेतकऱ्यांना द्या, अशा प्रकारची भूमिका राज्यभरातील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.

कोतुळ आंदोलनात याच भूमिकेनुसार आंदोलन सुरू करण्यात आले असून पंचक्रोशीतील शेतकरी दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने या आंदोलनात सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भांगरे यांनीही आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

आंदोलनाचे नेतृत्व पंचक्रोशीतील शेतकरी करत असून सर्वांना एकत्र करण्यासाठी कॉ. सदाशिव साबळे, सागर शेटे, बाळासाहेब देशमुख, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, निलेश तळेकर, संजय साबळे आदी परिश्रम घेत आहोत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 695
अकोले दूध आंदोलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

वडझरी बुद्रुक येथे खाण व क्रेशरविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण; ‘आता आरपारची लढाई’ म्हणत तीव्र एल्गार

June 1, 2026

अकोल्यात किसान सभेचे तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून तीव्र आंदोलन

May 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.