Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये मातेच्या डोळ्यासमोर बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीला पळविले, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये मातेच्या डोळ्यासमोर बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीला पळविले, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, १० जुलै | संगमनेर

दीड वर्षाच्या चिमुकलीला शेताच्या बांधावर ठेवत चारा कापणीचे काम करणाऱ्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने चिमुकलीवर हल्ला चढवत तिला ठार करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा गावात बुधवारी संध्याकाळी घडली.

ओवी सचिन गडाख (रा. हिवरगाव पावसा, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बिबट्याने चिमुकलीची मान आपल्या जबड्यात पकडत जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतली. चिमुकलीचा प्रतिकार अयशस्वी ठरला. जखमी अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हिवरगाव पावसा गावालगत रस्त्याच्या कडेला गडाख वस्ती आहे. बुधवारी संध्याकाळी या चिमुकलीची आई तिला घेऊन घास कापण्यासाठी शेतात आली होती. चिमुकलीला शेताच्या बांधावर ठेवून ती घास कापत असतानाच जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगदपणे चिमुकलेला आपल्या जबड्यात पकडत जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आणि चिमुकलीच्या मातेने आरडाओरडा केला.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतल्याने बिबट्याने चिमुकलीला तेथेच सोडत पळ काढला. या चिमुकलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला होता.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,377
बिबट्या हल्ला वनविभाग संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.