Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयाने ठोठावला कारावास आणि नुकसान भरपाईची शिक्षा
न्यायालय

चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयाने ठोठावला कारावास आणि नुकसान भरपाईची शिक्षा

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एच. दाभाडे यांनी केला निवाडा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १४ जुलै

उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वठल्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये संगमनेर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड या आरोपीला सहा महिने साधा कारावास आणि तक्रारदाराला ३ लाख ३८ हजार २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे.

समीर महाले यांचे शिवसाई ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान असून संदीप आव्हाड आणि तक्रारदार समीर महाले यांच्यात असलेल्या ओळखीतून आव्हाड याने जुलै २०१७ मध्ये ५० ग्रॅमची एक सोन्याची साखळी आणि ९.३२० मिलीची एक सोन्याची अंगठी असे १,६९,१३० रुपये किमतीचे दागिने तीन महिन्यांच्या उधारीवर घेतले होते. महाले यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने संगमनेर शाखेचा बंधन बँकेचा १,६९,१३० रुपयांचा चेक तक्रारदाराला दिला होता.

तक्रारदार फिर्यादी समीर महाले यांनी सदरचा चेक आपल्या बँक खात्यात भरला असता निधी अपुरा असल्याच्या कारणावरून तो परत आला. ही बाब तक्रारदाराने आरोपीला सांगितल्यानंतर आरोपीने दीड महिन्यानंतर सदरचा चेक पुन्हा भरण्यास सांगितले. मात्र पुन्हा चेक न वठल्याने तक्रारदाराने याबाबतची माहिती आरोपीला दिली. तरी देखील पैसे न मिळाल्याने महाले यांनी आरोपी आव्हाड याला ॲड. पी. एस. कोल्हे यांच्यामार्फत नोटीस पाठवून चेकच्या रकमेची मागणी केली. तरी देखील आरोपी आव्हाड यांनी पैसे दिले नाही.

त्यामुळे महाले यांनी ॲड. पी. एस. कोल्हे यांच्यामार्फत आरोपी संदीप आव्हाड याच्या विरोधात संगमनेर न्यायालयात चेक बाउन्स प्रकरणी खटला दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एच. दाभाडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

आरोपी संदीप आव्हाड याने न्यायालयासमोर महाले यांना व्यवहारापोटी चेक दिल्याचे नाकारले. उलट भिशीच्या रकमेची परतफेड करताना सुरक्षेच्या उद्देशाने धनादेश दिल्याचे न्यायालयाला सांगितले. यासाठी दोन साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविण्यात आल्या. मात्र तोंडी विधानाखेरीज कोणतेही कागदपत्रे यासाठी दाखल करण्यात आले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने बचावाचा मुद्दा फेटाळून लावला.

फिर्यादी महाले यांचे वकील पी. एस. कोल्हे आणि आरोपींच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एच. दाभाडे यांनी आरोपी आव्हाड याला दोषी ठरवत गुरुवारी (११ जुलै) सहा महिने साधा कारावास आणि तक्रारदाराला ३ लाख ३८ हजार २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधा कारावास आरोपीला भोगावा लागणार आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,099
धनादेश न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.