Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद!, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ बंद ठेवून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनात सामील
आंदोलन

दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद!, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोतुळ बंद ठेवून पंचक्रोशीतील शेतकरी आंदोलनात सामील

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ जुलै ते २१ जुलै या काळात राज्यभर संघर्ष सप्ताह
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2024Updated:15/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार १५ जुलै 

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ जुलै ते २१ जुलै या काळात राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240715-WA0035.mp4

आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी. जे. देशमुख, सिताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गीते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, निलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 651
अजित नवले कोतुळ दूध आंदोलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.