Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील ‘या आरोपीला’ न्यायालयासमोर हजर करा, जेल प्रशासनाला सेशन कोर्टाचे आदेश
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील ‘या आरोपीला’ न्यायालयासमोर हजर करा, जेल प्रशासनाला सेशन कोर्टाचे आदेश

सहकाराच्या दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/07/2024Updated:16/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार १६ जुलै | अनंत पांगारकर

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत. यातील भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे.

या खटल्यात जामीनावर मुक्तता झालेले अन्य पाच आरोपी न्यायालयीन तारखांना उपस्थित राहत असताना अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ याला मात्र जेल प्रशासनाकडून न्यायालयीन कामकाजाच्या वेळी उपस्थित ठेवले जात नसल्याने अखेरीस गेल्या आठवड्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी या संदर्भात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला (प्रोडक्शन वॉरंट) आदेश दिले आहे. त्यामुळे पुढील तारखेवेळी गुंजाळ याला न्यायालयासमोर जेल प्रशासनाला हजर करावे लागणार आहे.

तर याच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला भाऊसाहेब कुटे हा देखील गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या विरोधात अद्याप न्यायालयात गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. तसेच त्याने अद्यापही जामीनासाठी न्यायालयासमोर अर्ज केलेला नाही. काही दिवस आजारपणाच्या नावाखाली त्याने रुग्णालयात पाहुणचार घेतल्याचे देखील समोर आले आहे. हजारो ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आल्याने या प्रकरणाकडे सहकारातील मातब्बरांसह ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,957
जिल्हा व सत्र न्यायालय दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे भाऊसाहेब गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.