Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये गुन्हे दाखल
पत्रकारिता

रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये गुन्हे दाखल

शहरातील काही रस्त्यांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

बुधवार, १७ जुलै 

रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय थाटून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर संगमनेरमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत. नव्याने आलेल्या भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २९३ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहे.

या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अतुल दिनकर उंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव आदींनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरमधील मेनरोडवर, अशोक चौक, नवीन नगर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हातगाडी, दुकाने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उपद्रव होईल अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पंधरा ते वीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्यात या कारवाया करण्यात आल्याचे समोर आले असले तरी रस्त्यावरील व्यावसायिकांच्या वाहतुकीला अडथळा आणण्याचे चित्र अद्यापही कायम आहे.

शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अतुल उंडे यांच्या पथकाने या कारवाया केल्या.

संगमनेर शहरातील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने रस्त्याने येजा करणाऱ्या अनेकांना या व्यवसायिकांचा त्रास होतो. यातून अनेकदा छोटे मोठे अपघात देखील होतात. मात्र रस्त्यावर व्यवसाय करताना प्रमाणापेक्षा जास्त जागेवर व्यवसाय करत वारंवार अडथळा आणणाऱ्या व्यवसायिकांना पोलिसांनी वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन देखील कोणताही उपयोग होत नसल्याने पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे पाऊल उचलले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,526
अतिक्रमण कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर…

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.