Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर अहमदनगर पोलीस फेरबदल सुरु; वादग्रस्त एलसीबीचे उपनिरीक्षक गोरे यांना हटविले तर १९ जण कार्यमुक्त, १४ जणांच्या अन्य विभागात बदल्या
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर अहमदनगर पोलीस फेरबदल सुरु; वादग्रस्त एलसीबीचे उपनिरीक्षक गोरे यांना हटविले तर १९ जण कार्यमुक्त, १४ जणांच्या अन्य विभागात बदल्या

खासदार निलेश लंके उपोषणावर ठाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी संध्याकाळी काढले सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार २१ जुलै 

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी संध्याकाळी नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. वादग्रस्त ठरलेल्या नगर एलसीबीच्या उपनिरीक्षक सोपान गोरे यांचा समावेश असून या शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही शनिवारी सुरू केली.

शनिवारी पोलीस मुख्यालयात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती दरम्यान जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आल्या आहे. खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या मागणीसाठी ते सोमवारपासून उपोषण करणार आहे. लंके यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला होता.

तर प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या ४२३ कर्मचाऱ्यांकडून पसंतीचे तीन पर्याय मागविण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला बोलावून घेऊन त्यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या उपस्थितीत या बदल्यांची प्रक्रिया सुरू होती.

गुन्हे शाखेतील ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या…

वादग्रस्त ठरलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील एकोणवीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच १४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या अन्य विभागात करण्यात आल्या असून गुन्हे शाखेतील एकूण ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. दरम्यान या शाखेच्या वादग्रस्त कारभारावरून सोमवारपासून अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषण करणार आहेत. त्यांच्या उपोषणापूर्वीच पोलीस प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…

स्थानिक गुन्हे शाखेत वादग्रस्त ठरलेले पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह समाधान सोळंके, मनोज महाजन, निकिता महाले, समाधान भाटेवाल, नीरज बोकील, संतोष पगारे, राहुल सानप, अतुल बोरसे, निशस्त्र दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, सागर काळे, अनिल बागुल, गौतम तायडे, रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, विश्वास पावरा, हेमंत भंगाळे, विवेक पवार, संभाजी पाटील, नितीन रणदिवे, प्रमोद वाघ यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर नाशिक परिक्षेत्रात करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी सायंकाळी काढले.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या जिल्ह्यात बदल्या…

जळगाव येथून सहाय्यक निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, किशोर पवार, हरीश भोये, गणेश अहिरे, संदीप परदेशी, नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, सोमनाथ दिवटे, धुळे येथून पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे, रोशन निकम, नंदुरबार येथून प्रवीण महाले, नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, जळगाव येथून संदीप हजारे या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,712
अहमदनगर पोलीस दत्तात्रय कराळे बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.