Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट… हे आहे कारण
न्यायालय

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट… हे आहे कारण

यापूर्वीही काढले होते वॉरंट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ जुलै

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने हे अटक वॉरंट काढले आहे.

२०१३ मध्ये जालना येथे ‘शंभुराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख असे तीस लाख रुपये नाट्य निर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्याला देण्यात आले नाहीत. प्रयोग आयोजित करून नाट्य निर्मात्याचे पैसे बुडविल्या प्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्या विरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

धनंजय घोरपडे (रा. वारजे, पुणे) यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) नुसार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

यापूर्वीही काढले होते वॉरंट…

न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिल्या प्रकरणे जरांगे पाटील यांच्या विरोधात यापूर्वी जामीन पात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर ते मे महिन्याच्या अखेरीस न्यायालयात हजर झाले. त्यावेळी न्यायालयाने जरांगे पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटीवर हे वॉरंट रद्द केले. परंतु त्यानंतर देखील झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा गैरहजर राहिल्याने जरांगे पाटील यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,251
पुणे न्यायालय मनोज जरांगे वॉरंट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.