Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज व उद्या संगमनेर तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ विशेष मोहीम, महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन
राजकारण

आज व उद्या संगमनेर तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ विशेष मोहीम, महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन

गावागावात आयोजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २५ जुलै 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गुरुवार व शुक्रवारी (२४ व २५ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली.

महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम घेतली जाणार आहे.

महायुती सरकारची बदनामी करण्यासाठी काही महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न संगमनेर येथे सुरू असल्यामुळे तो हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या मागणीनुसार ही मोहीम राबविली जाणार आहे. ज्या महिलांनी ऑफलाईन फॉर्म भरून दिले आहे परंतु त्यांचे अजून ऑनलाईन फॉर्म भरले गेले नाही त्यांनी पुन्हा नव्याने फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संगमनेरच्या संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.

दोन दिवस होणाऱ्या विशेष मोहिमेसाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्रप्रमुख व त्या-त्या गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावात योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांशी संपर्क साधून लाभ मिळवून द्यावा.

या विशेष मोहिमेसाठी ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, सीआरपी बचतगट, अध्यक्ष सचिव सदस्य बचत गट, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, पर्यवेक्षिका, सेतू ऑपरेटर उपस्थित राहणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल खताळ, वैभव लांडगे, कविता पाटील, शरद गोरडे, रौफ शेख, अतुल कासट, सरपंच संदीप देशमुख, मयूर दिघे, सरपंच श्रीनाथ थोरात, सरपंच शशिकला आहेर, रोहिदास साबळे, हरीश वलवे, शिवाजी आहेर, संदेश देशमुख, सतीश गोपाळे, रोहिदास गुंजाळ, सुयोग गुंजाळ, सुरेश लांडगे, शशिकांत मतकर यांनी केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 908
अमोल खताळ भाजप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा…

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.