Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण, जेल प्रशासनाने आरोपीला केले न्यायालयासमोर हजर… आर्थिक गुन्हे शाखेने भाऊसाहेब कुटे विरोधातही केले आरोपपत्र दाखल… पुढील तारखेकडे लक्ष
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण, जेल प्रशासनाने आरोपीला केले न्यायालयासमोर हजर… आर्थिक गुन्हे शाखेने भाऊसाहेब कुटे विरोधातही केले आरोपपत्र दाखल… पुढील तारखेकडे लक्ष

ठेवीदारांचे लक्ष लागलेला खटला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/07/2024Updated:26/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २६ जुलै | अनंत पांगारकर

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैव्यवहारप्रकरणी न्यायालयातील तारखांना सातत्याने गैरहजर असलेल्या न्यायालयीन कोठडीतील प्रमूख आरोपीपैकी एक असलेला आरोपी, पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला शुक्रवारी जेल प्रशासनाने न्यायालयासमोर हजर केले. त्याच्यासह अन्य पाच आरोपी देखील न्यायालयात उपस्थित होते.

तर या खटल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्या विरोधातदेखील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून आता कुटे यालादेखील न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला असामी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात फसवणुकीसह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामागील मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड हा भाऊसाहेब कुटेच असून गेले अनेक दिवस तो फरार होता. भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांचा देखील आरोपीत समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने कुटुंबीयांना जामीन मंजूर केल्यानंतर कुटे पोलिसात हजर झाला होता.

गेले काही दिवस उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात ठाण मांडून असलेल्या कुटेची रवानगी सध्या नासिक येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यातच आता आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या विरोधातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्याने आता त्यालादेखील प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

दरम्यान याप्रकरणी तुरुंगात असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला जेल प्रशासनाकडून न्यायालयीन तारखेवेळी हजर केले जात नसल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या न्यायालयाने जेल प्रशासनाला त्याला तारखेवेळी हजर ठेवण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट काढले होते. त्यामुळे त्याला आज जेल प्रशासनाने न्यायालयात हजर केले होते.

दरम्यान आज न्यायालयाचे कामकाज चालू शकले नसल्याने आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया पुढील तारखेवेळी ८ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. यावेळी या खटल्यातील आणखी एक प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला देखील आरोपपत्र दाखल झाल्याने जेल प्रशासनाला न्यायालयासमोर उपस्थित ठेवावे लागणार आहे.

याआधी सहा जणांचे व आता कुटे याच्या विरोधात आरोप पत्र दाखल झाल्याने आता या सर्वांवर आरोप निश्चित केल्यानंतर न्यायालयीन सुनावणीला सुरुवात होणार आहे. या गुन्ह्यातील काही आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून काही आरोपी फरार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांना त्यांचा देखील शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,512
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे भाऊसाहेब गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.