Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शनिवारी मध्यरात्री एक वाजता महाराष्ट्रासह १० राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना मिळाले नवे राज्यपाल; महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन
महाराष्ट्र संवाद विशेष

शनिवारी मध्यरात्री एक वाजता महाराष्ट्रासह १० राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना मिळाले नवे राज्यपाल; महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्रातील भाजप नेते हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २८ जुलै 

नवी दिल्ली : शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राला तिसऱ्यांदा नवे राज्यपाल मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल.

तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले. ते कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

२००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेत देशाचे प्रतिनिधित्व केले.

पाच वर्षांतील तिसरे राज्यपाल… राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२३ अशा सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे पद भूषविले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकूण २४ वे राज्यपाल ठरले आहेत.

नवे राज्यपाल आणि त्यांच्या नियुक्तीची ठिकाणे…

सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र

हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान

संतोषकुमार गंगवार – झारखंड

रमण डेका – छत्तीसगड

सी. एच. विजयशंकर – मेघालय

ओमप्रकाश माथूर – सिक्किम

गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड

लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)

जिष्णू देव वर्मा – तेलंगण

के. कैलाशनाथन – पुदुच्चेरी (उप राज्यपाल)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

राधाकृष्णन ओळखले जातात तमिळनाडूचे मोदी…

दक्षिणेत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपसाठी महत्त्वाचे नेते म्हणून राधाकृष्णन यांचे नाव आघाडीवर आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०१२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावरील हल्लेखोरांना मोकाट सोडले गेल्याबद्दल त्यांनी मेट्टुपालयममध्ये निदर्शने केली होती. त्याबद्दल त्यांना अटक झाली होती. त्याआधी १९९८ मध्ये कोइमतूरमधील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळविला होता. २०१४ तसेच २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी कडवी झुंज दिली होती. अशा कामगिरीबद्दल त्यांना ‘तमिळनाडूचे मोदी’ असे संबोधले जाते

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 577
महाराष्ट्र राज्यपाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

31/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

By Annant Ppangarkar01/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या…

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.