Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » या मागणीसाठी कचरा ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांविरोधात अखेर ठरलं… १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात दाखविणार काळे झेंडे
आंदोलन

या मागणीसाठी कचरा ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांविरोधात अखेर ठरलं… १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात दाखविणार काळे झेंडे

गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांना देणार निवेदन, माजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख प्रसाद पवार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2024Updated:01/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २८ जुलै 

स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि घंटागाडीवर घरोघर जात कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नी ठेकेदार आणि संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संगमनेर शहर व उपनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीने “स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर” या ब्रीद वाक्याची पूरती वाट लावली आहे. या कंपनीशी संलग्न असलेल्या घंटा गाडीवरील कचरा गोळा करणारा कामगारांच्या उघड्यावरच निर्माण केलेल्या वस्तीमुळे या कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

वारंवार निवेदने देऊन तक्रारी करून देखील संगमनेर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांसह घंटा गाडीवरील या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आता स्थानिक नागरिकांसह आक्रमक पवित्रा घेत १५ ऑगस्टला नगरपरिषद प्रांगणात काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे.

या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पवार यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी या प्रश्नाला माध्यमातून वाचा फोडली होती. घंटा गाडीवर काम करणाऱ्या कामगारांचे सध्या वास्तव्य असलेल्या ठिकाणाहून स्थलांतर करण्याची मागणी त्यांनी केली. वास्तविक संगमनेर नगर परिषदेने शहरातील कचरा घरोघर जाऊन गोळा करण्याचा ठेका नाशिक येथील एका कंपनीला दिला आहे. या कंपनीचे संलग्न असलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था करणे हे ठेकेदाराचे काम आहे. मात्र ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या आरोग्याची व राहण्याची काळजी न घेता त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परदेशपुरा भागात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र या कामगारांच्या व कुटुंबीयांच्या राहणीमानामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित ठेकेदाराने त्यांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी संगमनेर नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.

मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसते. त्यामुळे आता या प्रश्नी आंदोलनाची भूमिका स्थानिक नागरिकांसह पवारांनी घेतली आहे. यासाठी गुरुवारी १ ऑगस्टला मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ ऑगस्टच्या कार्यक्रमा वेळी काळे झेंडे दाखविले जाणार आहे.

 

वेळ मारून नेण्याचे धोरण…

या प्रश्नावर तक्रारी निवेदने दिले, मात्र संबंधितांकडून वेळ मारून नेण्याच्या धोरण असल्याचे दिसते. माध्यमातून बातम्या येतात कंपनीचे ठेकेदार जयेश ब्राह्मणकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे आठ-दहा दिवसात या कामगारांच्या कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करण्याचा शब्द दिला होता. माणुसकीच्या नात्याने त्यांना दहा दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर संपर्क साधला असता त्यांच्याकडून दोन दिवसात भेटू, बोलू, चर्चा करू, थोडं थांबा, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. या कर्मचाऱ्यांनी येथे राहण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सह्या घेण्यास सुरुवात केली, मात्र याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. 

माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात लगेचच जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून या परिसरात साफसफाई करण्यात आली. सफाईपूर्वी या परिसरातील कचरा, घाणीचे वास्तव भयानक होते. तसेच घंटागाडीवरील कामगारांच्या अश्लील गैरवर्तवणुकीचे, स्नानाचे, कचरा गाड्यांचे व्हिडिओ भयानक आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला ३१ जुलै पूर्वी या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यास आदेश द्यावेत. असे झाले नाही तर आंदोलन निश्चित आहे. – प्रसाद पवार.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 17,644
आंदोलन घंटागाडी प्रसाद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.