शुक्रवार, ०२ ऑगस्ट
संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त शुक्रवारी सकाळी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध होताच काही वेळातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आभार मानले आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूजने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक…
आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था… ॲड. शेख यांनी वेधले लक्ष
देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांच्या नावाने बांधलेल्या या वास्तूचे दुरवस्था झाल्याने या संदर्भात ॲड. सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना पत्र देत त्यांचे लक्ष वेधले होते.
तसेच या संदर्भातील वृत्त देखील ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’मध्ये प्रसिद्ध झाले. वृत्त प्रसिद्ध होताच तात्काळ या वास्तूच्या दुरुस्तीस प्रारंभ झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आणि महाराष्ट्र संवाद न्यूजचे आभार मानले आहे. इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाच्या छायाचित्र असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या आभाराची पोस्ट समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
समाज माध्यमात मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानणारी व्हायरल झालेली पोस्ट…

वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ कामात सुरुवात झाल्याने पालिका प्रशासनाने वरवर काम न करता ॲड. शेख यांनी मागणी केल्याप्रमाणे आझाद भवनातील सर्व कामे पूर्णत्वास नेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


