Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील या आरोपीला खंडपीठाचा दिलासा, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारला होता जामीन
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील या आरोपीला खंडपीठाचा दिलासा, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारला होता जामीन

जामीन फेटाळल्यानंतर देखील आर्थिक गुन्हे शाखेने महाराजांना लावला नव्हता हात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2024Updated:03/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०३ ऑगस्ट | अनंत पांगारकर

संगमनेर मधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कपाटे यांना जामीन मंजूर झाल्याने ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अपिलामध्ये जाणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ८१ कोटी रुपयांचा कागदोपत्री घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य ठपका चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह १७ प्रमुख आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या चार अशा २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे.

यात आरोपी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचे नाव कर्जदार आरोपी म्हणून समोर आले.

पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांच्यात तब्बल २४० कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे देखील एका करारनाम्याआधारे समोर आले होते. यामुळे संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कपाटे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

त्यानंतर कपाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. शैलेश कातनेश्वरकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. कपाटे यांचा पतसंस्थेच्या कारभाराशी संबंध नाही. त्यांच्या खात्यात आलेल्या रक्कमा त्यांनी पतसंस्थेचे मॅनेजर भाऊसाहेब गुंजाळ व चेअरमन भाऊसाहेब कुटे यांच्या सांगण्यावरून इतर लोकांना वर्ग केल्या होत्या. असा युक्तिवाद करण्यात आला. खंडपीठाने कपाटे यांचा जामीन अर्ज मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे.

तसेच या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांना आवश्यक वाटेल त्यावेळी चौकशीसाठी सुदर्शन महाराजांना हजर राहावे लागणार आहे. तपासी अधिकाऱ्यांनी सुदर्शन महाराजांना अटक केल्यास त्यांची पंधरा हजार रुपयांच्या बॉण्डवर मुक्तता करण्याचे देखील आदेश खंडपीठाने दिले आहे. दरम्यान या निर्णयामुळे ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले असून या गुन्ह्याचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील परत ठेवीदारांना दिलासा देणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,861
चेतन कपाटे छत्रपती संभाजी नगर खंडपीठ जामीन दूधगंगा पतसंस्था सुदर्शन महाराज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.