मंगळवार, ०६ ऑगस्ट
बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे डी. के. मोरे जनता विद्यालय शाळेतील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना कपाळावर गंध लावण्यास विरोध करतात आणि विद्यार्थ्यांना मारतात, असे शाळेतील विद्यार्थ्यांकडून समजल्याने शाळेच्या गेटवर आंदोलन करत निवेदन देण्यात आले.
हिंदू संस्कृतीचा शाळा अनादर करत असून कपाळावरील गंधामुळे एकाग्रता वाढवणे, शितलता प्रदान करणे, असे अनेक वैज्ञानिक फायदे यात आहे. महाराष्ट्र सरकारचा शाळेत टिळा लावण्यांचा अध्यादेशही पारीत आहे.
शाळा ही विद्येचे मंदिर आहे. त्या मंदिरात कपाळावर गंध लावण्यास विद्यार्थ्यांचा हक्क आहे. त्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. गंध लावण्यास विरोध करू नये. केल्यास आपल्या विरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या निवेदनातून यावेळी देण्यात आला.
यावेळी अविनाश शहा, सिद्धेश पवार, अभिजित घाडगे, अभिनाथ शिंदे, आकाश बर्डे, पूजा अरगडे, रेखा गलांडे, ह.भ.प. रोहिणी राऊत, कृष्णा सारडा आदींनी सकल हिंदू समाज व एकलव्य संघटनेच्या योगेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. यावेळी संगमनेर तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


