बुधवार, ०७ ऑगस्ट
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उपयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या समावेश असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या शहरातील अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहे.
बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात बदलीचे ठिकाण…
★ संदीप पालवे – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजी नगर (पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड)
★ संदीप भाजीभाकरे – पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर)
★ विवेक विठ्ठल मासाळ – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १३, गडचिरोली (पोलीस उपायुक्त पुणे शहर)
★ सचिन बाळासाहेब गुंजाळ – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर (पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर)
★ रोहिदास पवार – पोलीस उपायुक्त पुणे शहर (पोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर)
★ दत्ताराम राठोड – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अपर पोलीस अधीक्षक, नागपूर)
★ विवेक पानसरे – पोलीस उपायुक्त, नवी मुंबई (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
★ रश्मी नांदेडकर – उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर (पोलीस उपायुक्त नवी मुंबई)
★ प्रदीप चव्हाण – मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई (पोलीस उपायुक्त, मुंबई)
★ मीना मकवाना – उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
★ दत्ता नलावडे – पोलीस उपायुक्त मुंबई (पोलीस उपायुक्त, लोहमार्ग मुंबई)
★ राजू भुजबळ – पोलीस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई)
★ रूपाली पोपटराव दरेकर – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षारक्षक छत्रपती संभाजी नगर)
★ अनिता दिलीपराव जमादार – पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, (छत्रपती संभाजीनगर)
★ लता पाटलोबा फड – पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक, पुणे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर)
★ विक्रांत विश्वास देशमुख – पोलीस उपायुक्त पुणे शहर (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे)


