Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गणेशच्या सभासदांचे जिल्हा बँकेविरोधातील आंदोलन स्थगित, फसवणूक झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सभासदांचा इशारा
आंदोलन

गणेशच्या सभासदांचे जिल्हा बँकेविरोधातील आंदोलन स्थगित, फसवणूक झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सभासदांचा इशारा

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ११ ऑगस्ट

राहाता | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राजकिय आकसापोटी कर्ज नाकारले जात असल्याच्या भावनेतुन श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे जिल्हा बँकेच्या विरोधातील सोमवारी (दि. १२ ऑगस्ट) आयोजित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे पाटील व उपाध्यक्ष विजयराव दंडवते पाटील यांनी दिली.

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२०२५ या हंगामाकरिता कर्ज मागणीचा प्रस्ताव जिल्हा सहकारी बँकेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा बँकेने राजकिय आकसापोटी नाकारला. मागील हंगामातही ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते, ते मात्र शेवटच्या क्षणी नाकारले होते.

याही वेळी कारखान्याने प्रस्ताव दाखल केला, तो नाकारला. त्यामुळे गणेश कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार आक्रमक झाले होते. येत्या सोमवारी जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान जिल्हा सहकारी बँकेने गणेशच्या सभासद, शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या २० ऑगस्ट रोजी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मिटींग आयोजित करण्यात आली आहे. त्या मिटींगमध्ये विषय पत्रिकेत गणेश कारखान्याच्या कर्जाबाबत विषय ठेवण्यात आला आहे. तसे बँकेने कळविल्याने तुर्तास १२ ऑगस्टचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मात्र २० ऑगस्टच्या जिल्हा बँकेच्या बैठकीत गणेश कारखान्याच्या कर्जाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास व कर्ज वितरीत न केल्यास, फसवणूक झाल्यास २७ ऑगस्टला पुन्हा जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर निषेध मोर्चाचे आयोजन केले जाईल, असा इशारा लहारे यांनी दिला आहे.

दरम्यान काल या संदर्भात गणेशनगर येथे संचालक मंडळातील सदस्य व काही सभासद, शेतकरी यांची या संदर्भात बैठक झाली. त्यात बँकेने गणेशच्या कर्जाबाबत सकारात्मक कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीला गणेशचे अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले, जेष्ठ नेते डॉ. एकनाथराव गोंदकर, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, गणेशचे संचालक भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, मुधकर सातव, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, माजी संचालक आप्पासाहेब बोठे, भाऊसाहेब चौधरी, चंद्रभान धनवटे, अविनाश दंडवते, सर्जेराव जाधव, बलराज धनवटे, उत्तमराव मते, चंद्रभान गुंजाळ, विक्रम वाघ, श्रीकांत मापारी, राहुल गाढवे, प्रा. एल. एम. डांगे, उत्तमराव घोरपडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 626
गणेश कारखाना विजय दंडवते सुधीर लहारे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJune 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा…

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.