Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या प्रकरणातील चौथा आरोपी चार महिन्यानंतर गजाआड! साकुर येथील अत्याचार प्रकरण
न्यायालय

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या प्रकरणातील चौथा आरोपी चार महिन्यानंतर गजाआड! साकुर येथील अत्याचार प्रकरण

तिघांविरोधात दोषारोप पत्रही झाले होते दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार १३ ऑगस्ट 

दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केल्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे.

विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता.

दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत रुबाब पान शॉप मध्ये नेले. पान शॉप मध्ये तिच्या तोंडाला रुमाल बांधून तसेच दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी अन्य आरोपीने त्याला मदत केली. अत्याचारावेळी आरोपी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून घेत बाहेरून कुलूप लावले होते.

तर प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांनी पान शॉपच्या शटरबाहेर थांबून देखरेख करत सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली. यावेळी तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला ‘तू येथे का आला, निघून जा’ अशी विचारणा करत त्याला दमबाजी केली. दरम्यान झालेल्या अत्याचारामुळे इज्जत गेली म्हणून पीडित मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.

त्यामुळे मुख्य आरोपीसह अन्य आरोपींविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६(३), १०९, ३०५, ५०६, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार संहिता कायदा कलम ४, ८, १२, १७, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासानंतर घारगाव पोलिसांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी सौरभ खेमनर, प्रशांत भडांगे व योगेश खेमनर या तिघांविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. तर विजय खेमनर हा फरार होता. तो घरी आल्याची माहिती समजल्यानंतर घारगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

या घटनेची बाल मानवी हक्क आयोग तसेच राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेतली होती. आरोपी विजय खेमनर याला जिल्हा न्यायालयासमोर सोमवारी हजर केले असता सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी गुन्ह्याच्या तपासाकामी आरोपीला पोलीस कोठडीची मागणी केली होती. जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपी विजय खेमनर याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,810
घारगाव घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.