Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » … म्हणून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप
राजकारण

… म्हणून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे यांनी केले आरोप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १९ ऑगस्ट

मुंबई : आम्ही राजकारणात ३० ते ४० वर्षे काढली आहेत. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री बनू नये का? केवळ प्रस्थापितांनीच मुख्यमंत्री बनायला पाहिजे का? उद्धव ठाकरे यांच्यावर नव्हे, तर आमच्यावर अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री बनण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते व यासाठी त्यांनी गुप्तपणे रणनीती आखली होती. त्यामुळेच त्यांनी भाजपशी युती तोडून मविआचा पर्याय निवडला, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे आहे, याची त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी स्वतः त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली असती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात मी मंत्री असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून माझ्या खात्यात हस्तक्षेप करत होते. निवडणुकीनंतर त्यांनी मला जर सांगितले असते की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे तर मी वातावरणनिर्मिती केली असती. पण, त्यांनी सर्वच बाबी अत्यंत गोपनीय पद्धतीने केल्या. राजकारणात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. उद्धव यांनी मला सांगितले की, शरद पवारांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले. तर शरद पवारांनी मला सांगितले की, उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा तुमच्या पक्षाचा निर्णय होता.

भाजपने उद्धवना कोणतेच आश्वासन दिले नव्हते…

भाजपच्या वरिष्ठांनी मला सांगितले की, मित्र पक्षाला जर अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यायचे ठरले असते तर त्यात कोणतीच अडचण नव्हती. भाजपने अनेक राज्यात मित्र पक्षांच्या कमी जागा येऊनही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. मात्र, २०१९ मध्ये विधानसभेचे निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत. उद्धव ठाकरेंना हे समजले की, त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे असल्यास भाजपाशी युती करून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा पर्याय उभा केला, असा आरोप शिंदे यांनी केला.

देशमुखांच्या काळात राजरोस भ्रष्टाचार…

अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना राजरोस भ्रष्टाचार चालला होता. त्यावेळी मी उद्धव ठाकरे, अजित पवार यांना त्याची कल्पना दिली होती. या भ्रष्टाचाराला चाप लावा, असे मी सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची किंमत अनिल देशमुख यांना मोजावे लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना याबाबत फैलावर घ्यायला पाहिजे होते, असेही शिंदे म्हणाले.

मला ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यायला नकार…

गडचिरोलीचा पालकमंत्री असताना मला झेड प्लस सुरक्षा प्रदान करायची होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या गोष्टीला नकार दिला. माझ्या विरोधात काय काय शिजत आहे हे मला समजत होते. मला तेव्हा धमक्या आल्या होत्या. कारण नक्षल्यांचा खत्म करण्याचे काम मी केले होते. त्यावेळी मला ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी ठरविले की ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी. मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन करून मला तसेच सुरक्षा देऊ नये, असे सांगितले. त्याबाबत मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला. माझ्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. ते विरोधी पक्षनेते होते, मात्र मी तर उद्धव ठाकरेंच्या जवळचा होतो. त्यामुळे ते माझ्याशी असे का वागले याचे मला नवल वाटले, असे ते म्हणाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 989
अनिल देशमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे महाविकास आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.