Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधारवरील पत्त्याचा पुरावा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…
महाराष्ट्र संवाद विशेष

आधारवरील पत्त्याचा पुरावा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…

नागरिकांना प्रथमच आधार काढावयाचे असल्यास नोंदणी निःशुल्क
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2024Updated:29/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि.२९ ऑगस्ट 

अहमदनगर : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांना आधारशी संलग्न ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत असणे आवश्यक असून नागरिकांनी आधारशी संलग्न माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शासकीय १०२ आधार केंद्र, महिला बाल विकास विभागाच्या ६९ आधार केंद्र, सीएससी ई-गव्हर्नन्स चे ७५ केंद्र, बँकेचे १४, बीएसएनएलचे ४, पोस्ट ऑफिसच्या ९८ अशा जिल्ह्यातील एकूण ३८८ आधार केंद्रांवर आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करता येईल.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये ६९ संच प्राप्त झाले आहे. आपण पहिल्यांदाच आधार काढत असला तर ते पूर्णत: मोफत असते, त्यासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जात नाही. नोंदणी करतांना जन्म दाखला, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरण्यात येतो. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपली आधार विषयक माहिती वैयक्तिक तपशिलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

नागरिकांना प्रथमच आधार काढावयाचे असल्यास नोंदणी निःशुल्क आहे. आधार नोंदणी करून दहा वर्षे झाली असतील आणि या कालावधीत एकदाही आधार कार्डच्या वापर कोठेही केला नसल्यास ऑनलाईन पद्धतीने अथवा जवळच्या शासकीय आधार केंद्रावर जावून आधार कार्डची माहिती अद्ययावत करून घ्यावी. असे केल्याने नागरिकांना आधारबाबतच्या येणाऱ्या अडचणी दूर होवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.

आधार अद्ययावत करतांना ओळखीचा पुरावा म्हणून व्होटिंग कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान फोटो पासबुक, नरेगा जॉब कार्ड, लग्न प्रमाणपत्र व छायाचित्र, शाळेचे ओळखपत्र, बँकेचे पासबुक यापैकी एक आवश्यक आहे. तर रहिवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक, शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, किसान पासबुक, नरेगा जॉब कार्ड, वीज देयक, पाणी देयक, दूरध्वनी देयक, लग्न प्रमाणपत्र किंवा गॅस जोडणी देयक यापैकी एक आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या https://myaadhaar.uidai.gov.in पोर्टलद्वारे आधार कार्डची डेमोग्राफिक अपडेट करता येते (नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्र., ई-मेल) त्यासाठी पन्नास रूपये इतक शुल्क आहे. हाताचे बोटाचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅनसाठी १०० रुपये इतके शुल्क निर्धारीत केलेले आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीकरिता क्युआर कोड स्कॅन करावे किंवा www.uidai.gov.in या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी. जवळचे आधार नोंदणी केंद्र शोधण्याकरीता https:// https://ahmednagar.nic.in/service/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 821
आधार सिद्धाराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.