Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह | बैठकीला न बोलावून पोलिसांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे? केंद्रीय मंत्री आठवलेंकडे करणार तक्रार – कैलास कासार
सामाजिक

शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह | बैठकीला न बोलावून पोलिसांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे? केंद्रीय मंत्री आठवलेंकडे करणार तक्रार – कैलास कासार

शांतता समितीची बैठक ठरतेय औपचारिकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2024Updated:04/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर 

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे.

मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले.

अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत असतात. मात्र सध्या संगमनेरमध्ये पोलीस खात्यात सगळेच नवखे अधिकारी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहेत. त्यातही त्यांच्या भोवती काही ठराविक लोकांचा गोतावळा जमल्याचे दिसते.

मंगळवारी झालेल्या या बैठकीवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला डावलण्यात आले. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नाही. विशेषतः शांतता समिती बैठकीवेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलावले जाते. कालच्या बैठकीत मात्र बऱ्याच जणांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप होत आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असताना सण-उत्सव देखील एकत्रितपणे साजरे केले जातात. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वजण काळजी घेत असतात. कोणत्याही सण उत्सवाच्या काळात शहर शांत कसे राहील, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी कशी होईल याची काळजी घेतली जाते. संगमनेरकर प्रशासनाला नेहमी साथ देत असतात.

            मंगळवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमच्या असं निदर्शनास आले की आम्हाला कुठेतरी जाणीवपूर्वक दावलले जात आहे. त्यामागे काय कारण असू शकते असा प्रश्न देखील आम्हाला पडला आहे आणि तो आम्हाला स्वतः होत आहे. कुठेतरी आम्हाला वाटतं आपण सर्वांनी एकत्रच राहाव. पण शांतता कमिटीच्या मीटिंगला न बोलावून पोलीस प्रशासन नेमका काय संदेश देत आहे, याचे उत्तर आम्हाला हवंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या देखील हा प्रकार निदर्शनास आणून दिला जाणार आहे. – कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 4,863
कैलास कासार पोलीस शांतता समिती बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.