Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापास १२ वर्ष सक्तमजुरी आणि द्रव्यदंडाची शिक्षा, संगमनेरच्या न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायालय

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापास १२ वर्ष सक्तमजुरी आणि द्रव्यदंडाची शिक्षा, संगमनेरच्या न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

संगमनेरकरांचे खटल्याकडे लागले होते लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २६ सप्टेंबर

आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली होती.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले. तर या खटल्यात त्यांना ॲड. स्मिता सस्कर यांनी सहाय्य केले.

खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पीडित मुलगी, फिर्यादी, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गहिनीनाथ खेडकर, संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया लोहारे यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.

अतिरिक्त सरकारी वकील गवते यांनी या खटल्यात सक्षम पुरावा न्यायालयासमोर आणत जोरदार युक्तिवाद करत आरोपीला शिक्षेची मागणी केली. सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला दोषी ठरवत भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ नुसार १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, कलम ३७६(२)(N) नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, पोक्सो कलम ६ नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली. आरोपीने सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपीला बारा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागेल.

पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात, पी एस साबळे, दिपाली राहणे व स्वाती नाईकवाडी यांनी या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्य केले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,537
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायाधीश दिलीप घुमरे सक्तमजुरी संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.