Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेचा सस्पेन्स कायम, कमी मतदानाबद्दल केली चिंता व्यक्त; दौऱ्यात ११ पक्षांच्या नेत्यांबरोबर केली चर्चा विधानसभा निवडणूक तयारीची पत्रकार परिषदेत दिली माहिती
निवडणूक

आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेचा सस्पेन्स कायम, कमी मतदानाबद्दल केली चिंता व्यक्त; दौऱ्यात ११ पक्षांच्या नेत्यांबरोबर केली चर्चा विधानसभा निवडणूक तयारीची पत्रकार परिषदेत दिली माहिती

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २८ सप्टेंबर

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९५ लाख तर महिला मतदारांची संख्याही ४ कोटी ६४ लाख आहे. तृतीयपंथी ५ हजार ९९७, तर दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ३२ हजार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार १९ लाख ४८ हजार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

या निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. खोटे व्हिडीओ पसरवले जातात. त्यावरही लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीत सभा स्थळावरून वाद होत असतात. त्यामुळे जो पहिला अर्ज करेल त्याला सभेचे ठिकाण द्यावे असेही सांगण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केले. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार असेल तर त्याची माहिती वर्तमान पत्रातून एकदा नाही तर तीन-तीन वेळा द्यावी लागेल असेही राजीव कुमार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकी दरम्यान ४ हजार कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर तपास यंत्रणाचेही लक्ष रहाणार आहे. प्रचारादरम्यान जर कोणी विमान किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करत असेल अशा वेळी काही तपासणी करायची असल्यास त्याचीही मुभा राहील असे ते म्हणाले.

दरम्यान पक्षीय चिन्ह वाटपाचा वाद सध्या कोर्टात असल्याने त्यावर बोलणे निवडणूक आयुक्तांनी टाळले. मतदानाच्या दिवशी प्रत्येकाला मतदान करता येईल याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच घोषीत केली जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 720
निवडणूक निवडणूक आयोग राजीव कुमार विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.