Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी मोफत तर ३ कोटी महिलांनी सवलतीत एसटी प्रवासाचा घेतला लाभ
महाराष्ट्र संवाद विशेष

नगर जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी मोफत तर ३ कोटी महिलांनी सवलतीत एसटी प्रवासाचा घेतला लाभ

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०४ ऑक्टोबर

अहमदनगर – देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. तर १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ जिल्ह्यातील ३ कोटी महिलांनी घेतला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू आहे.

राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे. सध्या राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एसटीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठीदेखील लागू आहे. वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.

महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला प्रवाशांची संख्या वाढली…

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. या घोषणेच्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून सर्व महिलांना ‘महिला सन्मान योजने’ अंतर्गत राज्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच राज्यांतर्गत धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे.

सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा, विंडो बुकींग, ऑनलाईन, मोबाईल ॲप, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार घेण्यात येतो. सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५० टक्के सवलत दिली असल्याने ५० टक्के प्रवास भाडे आकारले जाते. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ. स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू व सेवाकरची रक्कम आकारण्यात येते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 520
एकनाथ शिंदे एसटी मोफत प्रवास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.