Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू, संगमनेर बसस्थानकारील घटना
अपघात

बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू, संगमनेर बसस्थानकारील घटना

उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०८ ऑक्टोंबर

संगमनेर – संगमनेर बसस्थानकावरील प्लँटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

सखुबाई महादू चव्हाण (वय ८४ रा आश्वी खुर्द) असे मयत महीलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक-पारनेर बस (क्रमांक एम. एच. ११ बी. एल. ९४०९) नाशिकहून संगमनेर बसस्थानकावर आली होती. याचवेळी सखुबाई चव्हाण ही जेष्ठ महीला आपल्या मुलीबरोबर बसस्थानकावर चालली होती. याच दरम्यान बसचालक प्लँटफार्मवर प्रवाशांची चढ उतार करण्याकरिता बस लावत असतांना अचानक ती पुढील बाजुच्या टायर खाली सापडली.

यात टायर महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. काही कळायच्या आतच हा अपघात घडल्याने महीलेचे दोन्ही पाय निकामी झाले. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे काही नागरिक, प्रवाशी मदतीसाठी धावले.

तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहीकेतुन महिलेला प्रथम नवीन नगररोडवरील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तीला लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला. जखमी महीलेला लोणी येथिल रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचे निधन झाले असल्याची माहिती आगार प्रमुख गुंड यांनी दिली.

या घटनेनंतर बस चालक स्वतः शहर पोलिस स्टेशनला हजर झाला असून शहर पोलिस पुढील तपास करत आहे.

बसस्थानकावर पोलिस चौकी असून या ठिकाणी पोलीसाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र अधिकारी बदलून गेल्यानंतर याकडे दुर्लक्ष होते. सध्या बसस्थानकात पोलिसाची नेमणूक करण्यात आली नाही. चोरी, अपघात, हाणामारी अशा घटना घडतेवेळी पोलिस हजर नसतात असे प्रवाशांनी सांगितले.

बसस्थानकात झालेल्या अपघाताबाबत शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहे. – रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,762
अपघात संगमनेर बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.