Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र संवाद न्यूज इम्पॅक्ट… अखेर खासदारांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक काढला! संबंधितांकडून तातडीने कारवाई
निवडणूक

महाराष्ट्र संवाद न्यूज इम्पॅक्ट… अखेर खासदारांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक काढला! संबंधितांकडून तातडीने कारवाई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2024Updated:19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १९ ऑक्टोबर 

संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नाम फलक ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तानंतर काढण्यात आला आहे. कापडाने झाकलेला नाम फलक वाऱ्यामुळे उघडा पडला होता तो काढून टाकल्याची माहिती प्रांताधिकारी तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे आणि खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रमोद कुलट यांनी दिली.

२० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात १५ ऑक्टोंबरपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे संगमनेरमधील राजकीय पक्षाच्या कार्यालयांवर लावण्यात आलेले नामफलक कापडाने तात्पुरत्या स्वरूपात झाकण्यात आले आहेत.

मात्र बस स्थानकाच्या मालकीच्या गाळ्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाचा नामफलकदेखील कापडाने झाकण्यात आला होता. मात्र या फलकावरील कापड उडून गेल्याने गेल्या दोन-तीन दिवसापासून हा फलक पूर्वस्थितीत उघडा होता. तो पुन्हा झाकणे अपेक्षित असताना तसे न घडल्याने ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने शनिवारी संध्याकाळी या संदर्भातील वृत्त वेब पोर्टलवर प्रसिद्ध करत आचारसंहितेच्या अंमलबजावणी बाबत शंका उपस्थित केली होती.

येथे वाचा आधीची बातमी…

https://maharashtrasanvadnews.com/?p=18262

दरम्यान या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन तसेच संबंधितांकडून तातडीने पावले उचलण्यात आली. आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच सदर फ्लेक्स (कार्यालयाचे नामफलक) पूर्णत: काढून टाकण्यात आले. या संदर्भातील माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे आणि खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रमोद कुलट यांनी महाराष्ट्र संवादला दिली.

संपूर्ण बोर्ड काढून टाकला…

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सदरचा बोर्ड झाकण्यात आला होता. परंतु त्यावरील कापड फाटल्याने बोर्ड उघडा पडला होता. आता संपूर्ण बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे. – शैलेश हिंगे, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, संगमनेर विधानसभा मतदारसंघ.

बोर्ड झाकलेला होता वाऱ्याने उडाला…

सदरचा बोर्ड आम्ही झाकलेला होता. तो वाऱ्याने उडाला. भिंतीला पक्का ठोकलेला असल्याने त्याला बाटल्या बांधण्यात आल्या होत्या मात्र जोराच्या वाऱ्यामुळे बाटल्या बांधलेले कापड उडून गेले आणि बोर्ड उघडा पडला. आता तो पूर्णतः काढून टाकण्यात आला आहे. – प्रमोद कुलट, स्वीय सहाय्यक संपर्क कार्यालय.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 717
आचारसंहिता कारवाई नामफलक प्रमोद कुलट भाऊसाहेब वाकचौरे विधानसभा निवडणूक शैलेश हिंगे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- उडीसा आणि आसाम या राज्यांतून पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी…

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.