Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार ठरले… पहिल्या ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा, महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्मुलाही ठरला! मुख्यमंत्री शिंदे विरोधात ठाकरेंचा हा शिलेदार लढणार जाहीर झालेल्या यादीत काही चुका – संजय राऊत
निवडणूक

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार ठरले… पहिल्या ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा, महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्मुलाही ठरला! मुख्यमंत्री शिंदे विरोधात ठाकरेंचा हा शिलेदार लढणार जाहीर झालेल्या यादीत काही चुका – संजय राऊत

यादीत बदलाची शक्यता...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २३ ऑक्टोबर

मुंबई – महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काही अंशी सुटला असून त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीनुसार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे मैदानात उतरणार आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीत काही वादग्रस्त जागांचाही समावेश आहे. यातील काही जागांवर काँग्रेसनं तर काही जागांवर अन्य छोट्या पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर त्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. त्यात काही प्रशासकीय चुका आहेत. हे कसं झालं हे आम्ही उद्या तपासून पाहू आणि त्यावर नव्यानं चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले. आमच्या यादीत शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित जागा आल्या आहेत. काही राष्ट्रवादी व काँग्रेसशी संबंधित जागा आहेत. त्यावर आम्ही नक्कीच चर्चा करू, असं राऊत यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत या यादीत प्रशासकीय चूक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळं ही यादी अंतिम आहे की यातील उमेदवारांच्या नावात काही बदल होणार आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

२७० जागांवर एकमत…

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांवर पूर्ण एकमत झालं आहे. इतर छोट्या पक्षांनाही सामावून घेणारं जागावाटप पूर्ण झालेलं आहे. २७० जागांवर आमची सहमती झाली आहे. त्याची यादीही बनवण्यात आली आहे. उरलेल्या जागांवर आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू होईल. अशा पद्धतीनं महाविकास आघाडी २८८ जागा पूर्ण ताकदीनं लढेल, असं राऊत यांनी सांगितलं.

छोट्या पक्षांना १८ जागा देणार…

महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना १८ जागा दिल्या जातील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. मात्र, या जागांचा तपशील सांगण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार खालील प्रमाणे… बघा यादी झूम करून

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,001
अंतिम उमेदवार यादी विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते.…

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.